Posts

सामान्यापासून असमान्यापर्यंतचा प्रवास म्हणजे नरेंद्र ते स्वामी विवेकानंद

Image
  स्वामी विवेकानंद            स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव  नरेंद्र विश्वनाथ दत्त  असे होते. त्यांचा  जन्म १२ जानेवारी १८६३  रोजी झाला त्यांचे  निधन ४ जुलै १९०२  रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी “रामकृष्ण मिशन” स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशनतर्फे त्यांनी धर्मप्रसार केला आणि अध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले. स्वामी विवेकानंद यांचे बालपण    विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ रोजी, सोमवारी (पौष कृष्ण सप्तमी) झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालय...